तुळशी विवाहाला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व आहे कारण ते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या दैवी मिलनाचे प्रतीक आहे , ज्याचे प्रतिनिधित्व पवित्र तुळशीच्या रोपाने केले आहे. हा विधी सद्गुणी आणि नीतिमान लोकांचे नेहमी दैवी संरक्षण करतात या विश्वासावर प्रकाश टाकतो.
शास्त्रामध्ये तुलसी विवाहाची एक कथा आहे. तुलसी ही पूर्वी वृंदा होती आणि तिचा पती जालंधर हा राक्षस होता. वृंदा पतिव्रता असल्याने तिला तिच्या पतीचे रक्षण करण्याचे वरदान मिळाले होते. वृंदाला मिळालेल्या या वरदानामुळे देवांना जालंधरचा वध करणे शक्य होत नव्हते. त्यावेळेस देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जालंधरचा वध करण्यासाठी वृंदाचे पतिव्रत धर्म मोडले. भगवान विष्णू जालंधरचे रूप धारण करून वृंदाकडे गेले, त्यामुळे वृंदाचा पतिव्रत धर्म मोडला गेला आणि जालंधरचा वध झाला. यामुळे वृंदा खूप दुखावली गेली आणि संतापली. रागाच्या भरात तिने भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूंनी देखील तिचा शाप स्वीकारला आणि त्यांचे शालिग्राममध्ये रूपांतर झाले. या शालिग्रामचीही भाविक पूजा करतात. वृंदाची भक्ती पाहून भगवान विष्णूंनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तुळशीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून दरवर्षी शालिग्राम आणि तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते.
Author: Saraswati Book | Publisher: Saraswati Book | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 32
