दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र.
दत्त संप्रदायातील महान अधिकारी प. प. टेंबे स्वामी महाराजांचे शिष्य प. पू. रंगावधुत महाराज (नारेश्वर) यांनी १९३५ साली सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला दत्त स्तुती पर अद्भुत असे स्तोत्रं लिहिले.
दत्तगुरूंनी कृपावंत होऊन पिशाच्च बाधा झालेल्या, आधी-व्याधीने ग्रस्त अश्या लक्ष्मी बेन त्रिपाठी यांच्या साठी पू. बापजीं कडून म्हणजे पू. रंगावधुत स्वामींच्या कडून ही दत्त बावन्नी लिहून घेतली. दत्त संप्रदायात "दत्त बावन्नीला" एटॉम बॉम्ब असे म्हणतात. सर्व मनोकामना परिपूर्ण करणारे हे दिव्य असे स्तोत्र आहे.
श्रीगुरुचरित्र, श्रीदत्त पुराण, श्रीदत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत ह्या सगळ्या ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावन्नी हे स्तोत्र आहे.
प. पू. रंगावधूत स्वामींना (पू. बापजींना) तुलसीदास ह्यांच्या हनुमान चालीसा प्रमाणे दत्त चालीसा असे स्तोत्र करायचे होते. लिहिता लिहिता त्या ओव्या ५२ झाल्या. पू. बापजी त्या ओव्या कमी जास्त करण्याचा प्रयत्नांत असताना दत्तप्रभूंनी प्रगट होऊन सुचवले की ह्यातील एकही ओवी कमी करू नये. वर्षाचे आठवडे ५२, गुरुचरित्राचे अध्याय ५२ म्हणून ह्या स्तोत्राची ओळख "दत्त बावन्नी" अशी राहील व दत्त बावन्नी म्हटलं की "रंगावधूत महाराज-नारेश्वर" अशी ओळख होईल !
Author: shreerangavadhutswami | Publisher: dharmik prakashan sanstha | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 32
