आज श्री समर्थ रामदासांच्यासारखे संत ज्यांनी हिंदू धर्मस्थापनेसाठी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन हे प्रथम बलोपासनेतून केलं. शरीर स्वास्थ्य असेल तरच धर्म यज्ञ पार पडू शकतो. एक सुदृढ शरीर कणखर मन तयार करते आणि कणखर मनावरच सुदृढ शरीर तयार होते. आणि तेव्हाच मनातले आराखडे हे फक्त मनात न राहता सत्यात उतरू शकतात. पाया उत्तम असेल तरच हव्या तेवढ्या उंचीच्या राशी उभ्या राहतील. आणि म्हणूनच लेखाचा प्रारंभ करण्यामागचा उद्देश हाच की, 'तुज आहे तुजपाशी; परंतू तू जागा चुकू नकोस." माणसाच्या जन्माला आल्यानंतर मिळालेला देह हा परमेश्वरानं दिलेला अमूल्य ठेवा आहे. आणि तो जपला तर त्याचं सोनं निशिच आहे. जन्माला आल्यानंतर धर्म-अर्थ-काम-मोक्ष हा पुरुषार्थ साधायचा असेल तर देह हा खूप महत्वाची भूमिका बजावतो. पाणी भरून ठेवायला जर का घडाच फुटका गळका असेल तर तो निरुपयोगी ठरतो. तोच घडा जर का अग्नीत ताऊन सुलाखून निघाला असेल तर मात्र त्याच्याइतकं शितल थंड पाणी मिळणे नाही. माणसाचं देखील असंच आहे. मन, बुद्धि, चित्त, देह हे जर का ज्ञानाच्या तेजातून बाहेर पडले तरच आयुष्यातलं यश आणि अपयश पचवण्याची ताकद त्याला येते. ज्ञानाचं म्हणाल तर भारतीय संस्कृती अष्टभुजांनी ज्ञान देऊ करतीये. मग ते महाभारत असेल, रामायण असेल, वेदादि उपनिषदं असतील. संपूर्ण षटदर्शन असेल. शक्तीचं म्हणाल तर आज रामदासांसारखे गुरु असतील आणि ज्यांनी ह्या महान योग शास्त्राची रचना केली ते महर्षी पतंजली ! आणि हीच योगसूत्रे आज आपण इथे बघणार आहोत.
Author: Aditi Akshay Godse | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 112
