नाथपंथ आणि दत्त संप्रदाय, नाथपंथ आणि वारकरी संप्रदाय यांमधील आदानप्रदानामधून आध्यात्मिक स्तरावर वैचारिक मंथन झाले आणि त्यातून आशयसंपन्न ग्रंथनिर्मिती झाली. संत निवृत्तिनाथ व संत ज्ञानेश्वरादि भावंडांनी नाथपंथाची दीक्षा घेतली असल्याने महाराष्ट्रातील जनमानसात नाथपंथियांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे, हे जाणून 'नाथसंप्रदायाचा इतिहास' हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. नाथ संप्रदायाचा उगम, पंथाचे संस्थापक, गुरू, तत्त्वज्ञान, ग्रंथ या महत्त्वपूर्ण माहितीबरोबरच नाथपंथियांचा वेश, आहारविहार, दंतकथा आणि त्यामागील सत्य अशा विविध बाबींवर या ग्रंथात प्रकाश टाकला आहे. नाथ संप्रदायाचे स्वरूप, त्याचे उपास्य दैवत, शाखाभेद, नवनाथांचे चरित्र, यौगिक तत्त्वज्ञान, त्यांचे वाङ्मय या सर्व पैलूंवर या ग्रंथात व्यासंगी भाष्य करण्यात आले आहे. तत्पूर्वी प्रत्येक पैलूची स्पष्ट ओळखही करून दिली आहे. या संप्रदायाचे महाराष्ट्रातील व राजस्थानातील स्वरूप यांचाही परिचय विस्ताराने करून देण्यात आला आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक व भाषिक परंपरांचे अभ्यासक, तज्ज्ञ, विद्यार्थी आणि उत्सुक वाचकांना नाथ संप्रदायाची सोप्या भाषेत ओळख करून देऊन चिकित्सक मार्गदर्शन करणारा हा मौलिक संदर्भग्रंथ वाचनीय व संग्रहणीय आहे.
Author: Dr. V. L. Manjul | Publisher: Sakal Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 215
