मी गीता आहे (Me Gita Ahe)

By: Deep Trivedi (Author) | Publisher:

Rs. 249.00

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

भगवद्गीतेच्या सायकोलॉजीवर एक अभूतपूर्व व्याख्या संपूर्ण 700 श्लोकांच्या सारासहीत

युद्ध सुरू होण्याआधी अर्जुन कृष्णांना सांगतो, राज्य मिळवण्यासाठी ना मला भावांना मारायचे आहे, ना हिंसा करायची आहे. शिवाय, धर्मशास्त्रदेखील याची अनुमती देत नाही.

  • तुम्ही अर्जुनाच्या विचारांशी सहमत आहात का?
  • तर मग कृष्ण अर्जुनाच्या विचारांशी सहमत का झाले नाही?
  • कृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्यास प्रवृत्त केले की योग्य मार्ग दाखवला?
  • युद्ध आणि हिंसा करण्यामागेही सबळ कारणं असू शकतात का?
  • कोण बरोबर कृष्ण की अर्जुन?
  • कृष्णांना गीता अठराव्या अध्यायांपर्यंत का सांगावी लागली?

जसं गीता एक, प्रश्न अनेक तसंच जीवनही एक आहे, प्रश्न अनेक आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं गीताच देऊ शकते. कारण कृष्ण हे मनुष्यजातीचे पहिले ‘सायकोलॉजिस्ट’ आहेत, तसेच ‘स्पिरिच्युअल सायकोलॉजी’च मन- जीवनातील प्रश्नांची अचूक उत्तरं देऊ शकते. पण गीतेच्या सायकोलॉजिकल बाजू नेहमीच दुर्लक्षित केल्या गेल्या.

मी गीता आहे, भगवद्गीतेची पहिली अशी व्याख्या आहे जी समस्त 700 श्लोकांचे ना केवळ ‘स्पिरिच्युअल’ तर संपूर्ण ‘सायकोलॉजिकल’ सार समजावते. यातून आपण गीतेचं सार एका सुंदर गोष्टीच्या माध्यमातून कृष्ण व अर्जुन यांच्याकडून ‘लाइव्ह’ समजून घेत आहोत असं वाटतं. दीप त्रिवेदी हे “मैं कृष्ण हूं”, “मी मन आहे” तसंच “सर्वकाही सायकोलॉजी आहे” बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक, गीतेवर 168 तास प्रदीर्घ वर्कशॉप्स घेणारे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड होल्डर आहेत. भगवद्गीतेची सायकोलॉजीवर केलेल्या कार्यांसाठी ‘ऑनरेरी डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित आहेत.

Details

Author: Deep Trivedi | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: