
दक्षिण भारतात केरळच्या देवभूमीत मुस्लिम समाजात जन्माला आलेल्या श्री.एम. यांनी श्रद्धेने उत्तुंग हिमालयापर्यंत प्रवास केला. या दीर्घ प्रवासात गुरूंच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक,धार्मिक ज्ञान त्यांनी ग्रहण केले. यादरम्यान त्यांना आलेले अद्भुत अनुभव, भेटलेली अलौकिक माणसे यांचे वर्णन त्यांनी ‘हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ या आत्मवृत्तात केले आहे.
अनेक असामान्य गोष्टींनी भरलेली ही सफर वाचकांना वेगळे विचार करायला लावते. समर्पण भावनेने जीवन जगणाऱ्या एका युवकाचा हा अध्यात्मिक प्रवास आहे. हाच युवक पुढे योगी म्हणून प्रसिद्ध होतो. तेच योगी श्री.एम. यांच्या जीवनप्रवासाचा श्री.वि.पटवर्धन यांनी केलेला हा अनुवाद आहे.
Author: Sri. M | Publisher: Sakal Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 367
