हिमालयीन गुरूंच्या सान्निध्यात चारधाम पदभ्रमण यात्रा (Himalayin Gurunchya Sanidhyat Chardham Padbhraman Yatra)
By: Uday Charushila Chintaman Nagnath (Author) | Publisher: Mymirror Publishing House
Guarantee safe & secure checkout
चारधाम... अर्थात सिद्धभूमी प्राचीन काळापासून हिमालय ही सिद्ध योग्यांची तपोभूमी आहे. आपले प्रारब्ध आणि संचित कर्म परिपक्व झालेले असेल तर इथे आपली सिद्ध योग्याशी भेट होईल हे निश्चित. अज्ञाताकडे, अनंताचा प्रवास करणारे सिद्ध योगी यांना जाणून घ्यायचे असेल तर, विज्ञानापलीकडच्या या जगात कोरी पाटी घेऊन एकट्याने सफर केली पाहिजे. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तीन लोकांच्या पलीकडे असलेला हा सिद्धलोक आपण कधीतरी अनुभवला पाहिजे. चल आणि अचल यांच्या संवादातून ही चारधाम यात्रा एक वेगळीच अनुभूती आपल्याला देऊन जाईल. चारधामच्या आपल्या पदभ्रमण यात्रेत लेखक उदय नागनाथ यांनी गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ व हेमकुंड साहेब या ठिकाणांना भेट दिली. या यात्रेदरम्यान एका योगी पुरुषाची भेट होण्याचे भाग्यही त्यांना लाभले. तो विलक्षण अनुभव त्यांना समृद्ध करून गेला. लेखक या यात्रेकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून तर पाहतातच, पण त्याबरोबरच सद्यपरिस्थितीचे ओघवत्या शैलीत वर्णनही करतात.
Author: Uday Charushila Chintaman Nagnath | Publisher: Mymirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 160
