रक्षणासाठी व कल्याणासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी एकरूप होऊन 'दत्तावतार ' घेतला. कलियुगात दत्तभक्ती श्रेष्ट मानली आहे. गुजरातमधील जुनागढजवळचा गिरनार पर्वत हे दत्तमहाराजांच्या जागृत स्थानापैकी एक. दहा हजार पायऱ्या व साडे तीन हजार फूट चढून गेल्यावरच स्वयंभू दत्त पादुकांचे दर्शन होते. श्रद्धेची कसोटी पाहणाऱ्या गिरनार यात्रेचे महत्व प्राचीन काळापासून आहे. श्री. प्रमोद केणे, विज्ञानाचे पदवीधर सांसारिक व एक छोटे उद्योजकही. दत्तभक्तीची ज्योत अंतरी निर्माण होऊन १-२ नव्हे तर चक्क १०८ गिरनार यात्रा त्यांच्याकडून घडल्या. त्याही कशा ? तर, सलग, अखंडीत, दर पौर्णिमेला, रात्रीच पर्वत चढून, कडाक्याची थंडी, तीव्र उन्हाळा, कोसळता पाऊस, धंद्यातील संकटे, तीव्र आर्थिक अडचणी, कशाचीही पर्वा न करता. भगवतकृपेच्या आड येणारी बंधने तोडणे हीच साधना. श्रद्धा-भक्ती यांच्या बळावर आपण काय करू शकतो याचे उदाहरण.
श्री. केणे, श्रद्धा, भक्ती, अनुभूती व विज्ञान यांचा संगम आहे. ४ जून २०१२ रोजी हा संकल्प संपन्न झाला. या गिरनार यात्रांत श्री. केणेंणा विलक्षण अनुभव येत गेले. ते त्यांनी विज्ञानाच्या कसोटीवर तोलले. या ईश्वरी लीलातील मर्म शोधून ते या लीलेतच सहभागी झाले. यातील काही मोजके अनुभव ते भक्तिमार्गावर असलेल्या साधकांसाठी पूर्वआदेशानुसार मोकळे करीत आहेत. इथे शांत रसाच्या भेटीला अद्भूत रस आला आहे. ही कथा सर्व इंद्रिये कानाशी एकत्र करून हळुवार चित्ताने ऐकावी. अविवेकाची काळजी फेडावी व जीवनयात्रा सफल करण्याचा प्रयत्न करावा.
"सद्गुरू प्रसादे पावन झालो, दत्तमयी जाहलो."
Author: Pramod Kene | Publisher: Pramod Kene | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 150