Description
अनिल अवचट म्हणजे विविध प्रकारचं विपुल लिखाण केलेले मनस्वी लेखक.
आपल्या सहज लिखाणातून वाचकांना एक ना अनेक विषयांची मुशाफिरी घडवून आणणारे. त्यांच्या लिखाणाने वाचकांच्या अनेक पिढ्या समृद्ध झाल्या.
या पुस्तकात अवचट कधी तबला, सतार, तंबोरे तयार करणाऱ्या कारागिरांचं जग उलगडून दाखवतात, तर कधी स्वतःच्या संगीतप्रेमाचा प्रवास ऐकवतात. कधी ओतूरला त्यांच्या बालपणात घेऊन जातात, तर कधी त्यांच्या मनात घर करून असलेल्या गावांची सफर घडवतात. कधी आयसीयूतल्या स्वत:कडे तटस्थ नजरेने बघू पाहतात, तर कधी झेन तत्वज्ञानाचं मर्म उलगडून दाखवतात.
अनिल अवचट यांचं हे पुस्तक अशा अनेक अनवट वाटांची सैर घडवून आणतं.
Details
Author: Anil Avchat | Publisher: Samkaleen Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 172