तुम्ही अध्यात्मसाधक असाल किंवा फक्त आपल्या जीवनात सुधारणा करण्याचा मार्ग शोधत अससाल तर आनंदानं जगण्याची कला तुम्हाला जगण्याचं साधंसोपं तत्वज्ञान देउ करते आणि सुखी होण्यासाठी उपयुक्त सुचना देते. अवघड परिस्थितीतही जगण्याबाबतची दृष्टी आनंदी कशी ठेवता येते, ते स्वामी राम हयांनी दाखवून दिलं आहे. सवयसंबंध कसे बदलता येतील, अंत:प्रेरणा कशा विकसित करता येतील, सामर्थ्य आणि इच्छाशक्ती - दोन्ही कशा जोपासता येतील, प्रमाची नाती कशी जपता येतील या आणि आणखीही काही गोष्टींबाबतच्या पध्दती त्यांनी सांगितल्या आहेत. मानवी मन आणि अंत:करण हयांबाबतच्या त्यांच्या अंतर्दुष्टीमुळे, ज्या कुणाला अधिक आरोग्यपूर्ण आणि सुखी आयुष्य जगण्याची आकांक्षा असेल, त्यांच्यासाठी हे पुस्तक प्रेरणास्त्रोत ठरेल. हया सुधारित आवृत्तीत पंडित राजमणी तिगुनैत, पीएच. डी. हयांच्या नवीन प्रस्तावनेचा समावेश आहे.
Author: Swami Rama | Publisher: Manjul India | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 170
