ओंकार साधनेचे रहस्य कोणते आणि त्याचे मर्म काय याचा मागोवा डॉ. प्रकाश जाधव यांनी या पुस्तकात घेतला आहे. यौगिक नाडी व आरोग्याची माहिती; तसेच आरोग्यदायी हस्तमुद्रांची माहितीही पुस्तकातून समजते. नाभिचक्राचे अंतरंगातून तान्देन साधनेची ओळख करून दिली आहे.
नाभिस्थ सूर्यमंडळ व साधकाग्नीचा शोध घेतला आहे. प्राचीन देहविज्ञानाची ओळख करून देऊन पतंजली आणि आद्य शंकराचार्यप्रणीत प्राणायाम विचार सांगितला आहे. 'भोजनान्ते विषं वारि...' या प्रकरणात भोजनानंतर पाणी पिणे कसे विषयसमान असते त्याची वैज्ञानिक माहिती दिली आहे.
जाणिजे यज्ञकर्म या प्रकरणात भोजनाविषयीची सर्व माहिती आणि मानवी देह्गंध हा वेगळा विषय वर्णिला आहे.
Author: Prakash Jadhav | Publisher: Dilipraj Prakashan Pvt. Ltd. | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 180
