माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे,’ असे भगवान बुद्ध यांनी म्हटले आहे. या नव्या धम्मातून बुद्धांनी सामाजिक क्रांतीचे काम केले. बुद्ध, बुद्धविचार व बुद्धांचे कार्य याचा परिचय डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ या पुस्तकातून करून दिला आहे. याच पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड यांनी वाचकांसमोर ठेवली आहे. यात सिद्धार्थाच्या जन्माची कथा, गोतम या नावाची उकल, बुद्धत्वप्राप्ती म्हणजे काय, तथागत, भगवान, सुगत, श्रवण या शब्दांचे अर्थ, गोतमाच्या गृहत्यागामागील कारणे, चार अरिय सत्ये, आत्मा, कर्म, पुनर्जन्म, भिक्खू संघाची निर्मिती, यशोधरा यांचा त्याग, वज्जींचा उपदेश, कालामसूक्तमधील उपदेश, बुद्धांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, बुद्धांवरील आक्षेप, तिपिटकातील प्रक्षिप्त सुत्ते, मिथकांची वस्तुनिष्ठ उकल, दैवी चमत्कार व कर्मकांडापासून बुद्ध तत्त्वज्ञानाची सुटका अशा अनेक विषयांवरील भाष्य या पुस्तकात आहे.
Author: Dr. Aa Ha Salunkhe | Publisher: Lokayat Prakashan | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 656
