श्रीकृष्णाच्या चातुर्यापासून ते त्याच्या महान तत्वज्ञानापर्यंत अनेक गुणांची आपल्याला ओळख आहे. मात्र, तो एक कुशल व्यवस्थापक होता, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, ' श्रीकृष्ण एक यशस्वी राजा होण्यासाठी जे मुलभूत गुण जबाबदार होते ते म्हणजे कुशलव्यवस्थापन आणि दुसरा गुण म्हणजे प्रभावी नेतृत्व.' हे पटवून देण्यासाठी प्रा. जाधव यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. ' यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते.'
या मुद्यांपासून ते सुरुवात करतात. यातंतर महाभारताच्या लढाईत श्रीकृष्णाचे मॅनेजमेंट कौशल्य कसे होते, याची माहिती ते देतात. शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ असते, श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र, त्याची डिनर डिप्लोमसी यावर विचार करून त्याचे मोरपीस, बासरी याचा उपयोग कसा झाला, ते सांगतात. कृष्णाने क्रायसिस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंटचा कसा वापर केला, हेही समजते.
Author: Prof.Namdevrao Jadhav | Publisher: Rajamata Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 200
