वेदकाळातील ऋषिमुनींनी तपश्चर्या करून प्राप्त केलेले विश्वाच्या उत्पत्तीविषयीचे आणि परमात्म्याविषयीचे ज्ञान सूत्रबद्ध रीतीने उपनिषदांमध्ये ग्रथित करण्यात आले आहे. जन्म ते मृत्यूपर्य॔तच्या प्रवासात जिवाने परमात्म्याप्रत जाण्याचा प्रवास कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन आणि शंकानिरसनही उपनिषदे करतात. पैकी, ईशोपनिषद, केनोपनिषद आणि मांडूक्य उपनिषदावर श्री एम यांनी केलेल्या इंग्लिशमधील भाष्याचा हा मराठी अनुवाद आहे. लेखकाविषयी : श्री एम म्हणजेच श्री. मुमताज अली हे आध्यात्मिक क्षेत्रातील विख्यात तत्त्ववेत्ते आणि गुरू आहेत. सर्व धर्मांमधील शिकवणींचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. अनेक वर्षे त्यांनी हिमालयात साधना केली आहे. 'सत्संग फाऊंडेशन' या संस्थेमार्फत ते देशविदेशात आध्यात्मिक ज्ञानदानाचे कार्य करतात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Author: Shri M | Publisher: Sakal Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 158
