रुचिरा भाग - २ (Ruchira Bhag - 2 )
रुचिरा भाग - २ (Ruchira Bhag - 2 )
by Kamlabai Ogale
Share
Product Description:
रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २ सिद्ध केला आहे.
कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय पेहराव चढवून रुचिराच्या पद्धतीनुसार वाटीचमच्याच्या प्रमाणात सिद्ध केले.
त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे.
पहिल्या भागाप्रमाणेच परंतू स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवत रुचिरा - भाग २ नेही यशाच्या पायर्या वेगाने चढल्या आहेत.
Product Details:
Author: Kamlabai Ogale
Publisher: Mehta Publishing House
Binding: Hardcover
Language: Marathi
Pages: 325
Book Condition:
View full details