Skip to product information
1 of 1

रुचिरा भाग - १ (Ruchira Bhag - 1)

रुचिरा भाग - १ (Ruchira Bhag - 1)

by Kamlabai Ogale

Regular price Rs. 340.00
Regular price Rs. 395.00 Sale price Rs. 340.00
13% off Sold out
Shipping calculated at checkout.

1 in stock

Product Description:

३० वर्षात अडीच लाख प्रतींच्या विक्रमी खपाचा उच्चांक गाठणारा पाकशास्त्रावरील एकमेव अजोड ग्रंथ रुचिरा ! पाककलेचे जणू दुसरे नाव.
रुचिरात बघून कोणताही पदार्थ करायला घ्यावा म्हणजे जो हमखास चांगलाच होणार ! याचे रहस्य काय ? तर रुचिरामध्ये पदार्थांच्या साहित्याचे प्रमाण तोळे-मासे ग्रॅम्समध्ये न देता खुद्द स्वयंपाकघरत प्रचलित असलल्या वाटी चमच्याच्या घरगुती मोजमापात दिलेले आहे आणि स्वत: कमलाबाईंनी हेच वाटी चमच्याचे घरगुती प्रमाण वापरून प्रत्येक पदार्थ करून पाहिलेला आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे हातचे काहीही राखून न ठेवता पदार्थाची साद्यन्त आणि सविस्तर कृती दिली आहे.
काही विशेष कल्पना व वैशिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून कमलाबाईनी 'रूचिरा'चे लेखन केले आहे. शाळाकॉलेजमध्ये शिकणार्‍या व नव्याने संसारात पडलेल्या मुलींना स्वयंपाकाची सवय नसते. त्यासाठी रोजच्या जेवणातले तसेच इतरही साधे व सुलभ असे पुष्कळ पदार्थ रुचिरामध्ये दिले आहेत.
तसेच निरनिराळ्या पाककृतींचे व इतर संबंधित विषयांचे योग्य वर्गीकरण करून व त्या त्या प्रमाणे पुस्तकाचे भाग पाडले आहेत. तसेच सजावट, मुलांना गंमत वाटेल असे पदार्थ, महाराष्ट्राबाहेरील पदार्थ, पानसुपारी विडे, संसारोपयोगी आणि व्यावहारिक उपयुक्त सूचना या महत्वाच्या व वैशिष्ट्यपूर्ण बाबींबद्दल मार्गदर्शन केले आहे. तसेच 'स्वयंपाकाला सुरवात करण्यापूर्वी' असा स्वतंत्र भाग घालून अत्यंत उपयोगी अशी वेगवेगळे पाक, मसाले, पनीर, आधुनिक साधनांची माहिती दिलेली आहे.
भरपूर रेखाचित्रे, साधी व रंगीत छायाचित्रे व अकारविल्हे अनुक्रमणिका याने हा ग्रंथ सजला आहे.
प्रत्येक गृहिणीच्या , क्वचित पुरूषांच्याही मदतीला सदैव तत्पर असलेला स्वयंपाकघरातला इष्ट मित्र म्हणणे रुचिरा ग्रंथ.

Product Details:

Author: Kamlabai Ogale

Publisher: Mehta Publishing House

Binding: Paperback

Language: Marathi

Pages: 344

Book Condition:

View full details