पन्नास वर्षांपूर्वी, 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी' प्रसिद्ध झाल्यापासून जगभर उत्कृष्ट आध्यात्मिक प्राचीन वाङ्मय म्हणून ह्या ग्रंथाचा गौरव झालेला आहे. भारताच्या आध्यात्मिकतेचा वारसा, आधुनिक जगात आणणाऱ्या अति सन्माननीय दूताचे कार्य, ह्या ग्रंथाने साध्य केलेले आहे. श्री श्री परमहंस योगानंद ह्यांनी आपली शिकवण व आध्यात्मिक कार्य दोन्ही कार्यरत ठेवण्यासाठी प्रस्थापित केलेल्या; योगोडा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया / सेल्फ रियलायझेशन फेलोशिप; ह्या संस्थांमार्फत प्रसिद्ध केले जात आहे. 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी' ह्याच्या प्रारंभीच्या प्रकाशनानंतर भरपूर विस्तार लेखकांनी पुनर्मुद्रणाच्या वेळी केलेला आहे. १९९६ साली ह्या ऐतिहासिक कार्याच्या पन्नासाव्या वर्षदिनाबद्दल जागृत झालेल्या कुतूहलपूर्ण उत्साहामुळे; परमहंस योगानंदांच्या संस्थांनी; योगानंद सत्संग सोसायटी/सेल्फरियलायझेशन फेलोशिप, यांच्या ग्रंथ संग्रहातील मूळ प्रतीचे छायाचित्रण केल्याइतके अधिप्रमाणित प्रतिरूप प्रकाशित करण्याची व्यवस्था केलेली आहे.
Author: Paramhans Yoganand | Publisher: Goel Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 496
