विजयाचे मानसशास्त्र - खेळाडूंप्रमाणेच सर्वच क्षेत्रात कर्तुत्व गाजवण्यासाठी प्रभावी तंत्र (Vijayache Manashastra)

By: Bhishmaraj Bam (Author) | Publisher: Majestic Publishing House

Rs. 250.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

ज्या खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, त्या सार्‍यांनाच हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. कारण यात बहुमोलाचे ज्ञान आणि संकल्पना दिलेल्या आहेत. म्हणून श्री. बाम यांनी हे पुस्तक लिहिले, हे फारच उत्तम झाले असे मला वाटते…

राहुल द्रविड,क्रिकेटपटू

श्री. बाम यांच्यासारखाच पराकोटीचा साधेपणा, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करण्याची अपेक्षा बाळगणार्‍या सर्वच खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी याचा अभ्यास करायला हवा म्हणजे क्षमता प्रगट करण्याच्या मार्गातले मानसिक अडथळे त्यांना दूर करता येतील. असामान्य प्रतिभेचा आविष्कार असलेले हे पुस्तक क्रीडाक्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हहवे….

गीत सेठी, जागतिक अजिंक्यवीर बिलीयर्ड्स

हे पुस्तक वाचताना माझ्या क्रीडा जीवनाचा संपूण7 पट डोळ्यांसमोर उलगडला गेला. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, अनुभवाच्या कसोटीवर पारखलेले हे ज्ञान आणि तंत्रे आता क्रीडाक्षेत्र गाजवण्याची अपेक्षा धरणार्‍या सार्‍याच खेळाडूंना या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध आहे…

अंजली भागवत, जागतिक नेमबाजीत अव्वल क्रमांक

ज्याला आपला खेळ उत्तम व्हावा असे वाटत असेल, त्याने हे पुस्तक वाचायलाच हवे. सनातन अशा योगशास्त्रातल्या तंत्रांचा खजिनाच श्री. बाम यांनी या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशात आणला आहे…

प्रकाश पडुकोण, जागतिक अजिंक्यवीर, बॅडमिंटन

कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, तर हे पुस्तक वाचायलाच हवे. हृदयाला आणि मनाला शांती देणारे असेच हे पुस्तक आहे. यशस्वी होण्याचे रहस्य त्यात साध्या, सोप्या आणि सुस्पष्ट भाषेत उलगडले आहे.

कमलेश मेहता,आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू

हे पुस्तक खेळांडूसाठी म्हणून लिहिलेले असले तरी त्यातली तंत्रे कोणत्याही क्षेत्रातल्या समस्यांना आणि आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी सक्षम बनवू शकतात. तेव्हा ते सर्वांनीच वाचावे आणि त्यातल्या तंत्राचा उपयोग करून पाहावा.

Details

Author: Bhishmaraj Bam | Publisher: Majestic Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 227