स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं (Swargachya Vatevar Kahitari Ghadla)

By: Sudha Murty (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 180.00 Rs. 153.00 SAVE 15%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

आपल्यापैकी प्रत्येकाकडेच एक कहाणी असते, जिच्यामुळे आपला
जगण्यावरचा विश्वास दृढ होतो...
सुधा मूर्तींच्या पुस्तकाच्या पानोपानी भेटणारी माणसं आणि त्यांच्या
रोमहर्षक कहाण्या आपल्या मनावर कायमचा ठसा ठेवून जातात; पण या
सर्व पुस्तकांमधून आपल्याला जी कुणी माणसं भेटतात, ती सुधा मूर्तींच्या
सामाजिक कार्याच्या निमित्तानं वेळोवेळी त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेली
असतात. अशाच प्रकारच्या कहाण्या इतरांच्याही आयुष्यात घडल्या
असतील. प्रत्येकाकडेच सांगण्यासारखं काहीतरी असेल.

‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’ हा अत्यंत संस्मरणीय अशा वीस
सत्यकथांचा संग्रह आहे. पेंग्विन प्रकाशनातर्फे जी खुली कथा स्पर्धा
आयोजित करण्यात आली, त्या स्पर्धेत उतरलेल्या असंख्य कथांचं सुधा
मूर्ती यांनी जातीनं परीक्षण करून, त्यातून उत्कृष्ट अशा या वीस कथा
निवडल्या.

आपण आपल्या खडतर, कष्टप्रद अशा दैनंदिन जीवनाची वाटचाल करत
असताना हे जीवन आशा, श्रद्धा, दयाळूपणा आणि आनंद यांनी किती
ओतप्रोत भरलेलं असतं, याची प्रचिती या कथा वाचून आपल्याला येते.
अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अशा कथांचा हा संग्रह, माणसाच्या
चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक वाचकाला मंत्रमुग्ध करून
टाकेल.

Details

Author: Sudha Murty | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 154