श्री स्वामी समर्थ कृपांकित शिष्यांची मांदियाळी (Shri Swami Samarth Krupankit Shishyanchi Mandiyali)
By: Dr.Yashavantarav S.Patil (Author) | Publisher: Navinya Prakashan
Guarantee safe & secure checkout
अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थमहाराजांनी त्यांच्या अवतार काळात सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले. सम सकला पाहू हा दृष्टिकोन कायम ठेवला. दया, क्षमा, शांती, करूणा आणि सत्य यांचा नेहमीच आग्रह धरला. ही पंचतत्त्वे रुजवण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी त्यांनी काही लीला, चमत्कारही केले. त्याद्वारे सत्यम, शिवम, सुंदरम या त्रिकालाबाधित तत्त्वांची जोपासना आणि उपासना केली. कर्मकांड, कालबाह्य रुढी, परंपरा, गंडे, द्रे, धागे यांचा धिक्कार करीत ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोगाच्या समन्वयास प्राधान्य दिले. मानवजातीच्या उध्दाराचे हे तत्त्वज्ञान श्री स्वामींनी त्यांच्या कृपांकित शिष्यांत संक्रमित केले. त्या शिष्यांनीही ती परंपरा पुढे तशीच चालू ठेवली.
Author: Dr.Yashavantarav S.Patil | Publisher: Navinya Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 311