पावसाआधीचा पाऊस (Pavasa adhicha Paus)

By: Shanta Shelke (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 200.00

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

माणसाच्या मनात खोलवर पाहण्याचा सहजपणा शान्ताबार्इंच्या लेखनात नेहमीच दिसून येतो. ‘निसर्गाकडे परत’ आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन दाखवतो. वागण्याबोलण्यात नक्की खरंखोटं काय हे कधी कधी समजणं कठीण असतं, असं ‘भूलभुलय्या’ सांगून जातो. समाजात वावरताना आपल्या स्वभावाचे, व्यक्तिमत्त्वाचे काटे आपण किती सहज खुडून टाकतो ते ‘गुलाब, काटे, कळ्या’ मधून जाणवत राहतं. अति काम करणं ही एक समस्या होते आहे ते ‘वर्कोहोलिक’ तीव्रतेनं दाखवून देतो. स्वातंत्र्यदेखील कधीतरी नकोसं वाटतं असं ‘मनातला किल्ला’ दाखवतो. छोट्याशा प्रसंगातून लहानपणीच अपयशांना, सत्याला कसं सामोरं जायचं याची ‘ओळख’ होते. मानवी स्वभावाचे असे विविध पैलू दाखवतानाच ‘चोरबाजार’मधून लेखिका आपल्याला वास्तवाकडे नेते. सामान्य माणसाची नस न् नस पकडत हा ‘पावसाआधीचा पाऊस’ चिंब आनंदानुभव देतो.

Details

Author: Shanta Shelke | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 152