पृथ्वीवर माणूस उपराच ( Pruthvivar Manus Uparach ) (Available for Rent)

By: Dr Sureshchandra Nadkarni (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 140.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

देव हे खरे तर अंतराळातील प्रवासी. हजारो वर्षांपूर्वी ते एकदा पृथ्वीवर आले अन त्यांनी एक नवा जीव निर्माण केला. त्याचं नाव 'माणूस!' तेव्हापासून हे अंतराळ प्रवासी चांगला माणूस घडविण्यासाठी धडपडत आहेत. दर सदतीस हजार वर्षांनी ते पृथ्वीवर येतात, चांगल्यांना ठेवतात आणि निकृष्टांना नष्ट करतात.
एरिक व्हॉन डेनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने पंचवीस वर्ष प्रयत्न केला आणि लाख मैलांपेक्षा अधिक भ्रमंती करून त्यांच्या वास्तवयाचा मागोवा घेतला. या प्रयत्नात कोट्याधीश व्हॉन डेनिकेन कफल्लक झाला. पण त्याने आपल्या संशोधनावर ग्रंथ प्रसिद्ध केले अन तो पुन्हा कोट्याधीश बनला. परंतु या खटाटोपात मानवाच्या निर्मितीचं रहस्य मात्र उलगडलं नाही. वाडिया महाविद्यालयात आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे चाळीस वर्षे प्राणिशास्त्राचे अध्यापन करणारे उर्दू शायर, क्रीडासमीक्षक अशा विविध नात्यांनी परिचित असलेले प्राध्यापक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी व्हॉन डेनिकेनच्या अफाट संशोधनाचा मागोवा घेत मानवाच्या अनैसर्गिक निर्मितीबद्दल मांडलेल्या कल्पना! - त्याची ही रसपूर्ण, विचारांना चालना देणारी कहाणी.

Details

Author: Dr Sureshchandra Nadkarni | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 84