Description
डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचं मी लिहिलेलं चरित्र 'एक होता कार्व्हर' १९८१ साली प्रकाशित झालं. कर्तबगार कृष्णवर्णीय अमेरिकन शास्त्रज्ञाच्या या जीवनकहाणीला तेव्हापासून आजपर्यंत उदंड प्रतिसाद मिळत आला आहे. गेल्या ४२ वर्षांत त्याच्या ४८ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. तीन पिढ्यांनी आवडीनं या पुस्तकाचा आस्वाद घेतला. हे पुस्तक आवडणारे अनेक पालक आणि प्रौढ वाचक ‘किशोर वाचकांसाठी या चरित्राचं पुनर्लेखन करा', असं सांगत, सुचवत आले. प्रकाशक दिलीप माजगावकरांनीही तसा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. त्या सर्वांचा मान राखत 'कार्व्हर'चं हे पुनर्लेखन केलं. - वीणा गवाणकर
Details
Author: Veena Gavankar | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 90