शान्ताबाईंनी आपल्या रसाळ, शब्दवेल्हाळ शैलीत कवितांचे केलेले हे रसग्रहण, शान्ताबाई म्हणतात, बालपणापासून समोर येईल, ती नवीजुनी, बरी वाईट कविता मी एका अनावर ओढीने अबोध आकर्षणाने वाचत राहिले. काही कवितांमधील नादमय शब्दांनी मला भुरळ घातली. काहींची कल्पनारंजित, अलंकारिक रचना मला आवडली. सहजपणे अर्थ उलगडावा आणि तो मनात झिरपत रहावा, असे काही कवितांच्या बाबतीत घडले. तर काही कविता मला कोणत्याही स्पष्टीकरणापलिकडच्या काही आंतरिक, अगम्य कारणामुळे प्रिय झाल्या. अशा सर्व कवितांबद्दलची ओढ,ती का आवडली, त्याची बलस्थानं, हळुवार वळणं, अंतर्मुख करणारी अर्थवाहकता याबद्दल येथे शान्ताबाईंनी भरभरून लिहिले आहे. त्यांनी रविकिरण मंडळ आणि नंतरचे अनिल-कुसुमाग्रजादी नवी या काळातील कवितांची निवड केली आहे.
यात कुसुमाग्रज, रेंदाळकर, पद्मा, ग.दि.माडगूळकर, अनिल, माधव ज्यूलियन, इंदिरा बी अशा दिग्गज कवींच्या कविता आहेत. या कविता आपण पूर्वीही वाचल्या असतील कदाचित अभ्यासलेल्याही असतील. पर शान्ताबाईंच्या रसग्रहणाबरोबर त्या वाचलणेहा वेगळाच वाचनानंद आहे.
Author: Shanta J. Shelke | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 168