
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र : एका महान क्रांतीचा प्रणेता (Chhatrapati Shivaji Maharaj Charitra : Eka Mahan Krantichia Praneta)
By: Dennis Kincaid (Author) | Publisher: Shree Mahavir Book House
Guarantee safe & secure checkout
सतराव्या शतकात महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात एक अलौकिक घटना घडली आणि ती म्हणजे मराठ्यांच्या सत्तेचा उदय! छत्रपती शिवाजी महराजांनी या सत्तेची स्थापना स्वराज्याचे तोरण बांधून केली. कोकण व देशावरील सह्याद्रीलगत च्या भागात स्थापन केलेल्या या राज्याने स्वभाषा,स्वधर्म, स्वातंत्र्याची जाणीव मराठी मावळ्यांमध्ये निर्माण केली. परकियांच्या गुलामगिरीला स्वाभिमानाने जगण्याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना करून दिली. शून्यातून स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रज्ञा, प्रतिभा, सामर्थ्य शिवरायांनी दाखवले त्यातच त्यांचे असामान्यत्व सामावलेले आहे. विजापूरची आदिलशाही, उत्तरेकडील महाबलढ्य मोगल साम्राज्य, गोव्यातील पोर्तुगज, कोकणातील सिद्दी. यांच्याशी अविश्रांत झगडून शिवाजी महाराजांनी आपले राज्य उभे केले. हे राज्य म्हणजे मध्ययुगीन प्रादेशिक राष्ट्रभावनेचा प्रभावी आविष्कार होता. एकूणच, एका महान क्रांतीचा प्रणेता म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहताना शिवाजी महाराजांची अनेक गुणवान वैशिष्ट्ये वेगळेपणासह उठून दिसतात. इतिहासाने त्यांची घेतलेली नोंद मराठी माणसालाच नव्हे तर महाराष्ट्राला तसेच संपूर्ण भारताला भूषणावह आहे, यात तिळमात्र शंका नाही.
Author: Dennis Kincaid | Publisher: Shree Mahavir Book House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 260