डॉ. फ्रित्जॉफ कॅप्रा यांच्या ‘द ताओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकाचा ‘भौतिकशास्त्र आणि अध्यात्म’ हा मराठी अनुवाद अविनाश ताडफळे यांनी केला आहे.
डॉ. फ्रित्जॉफ कॅप्रा या प्रसिद्ध अणुवैज्ञानिकाने गेल्या शतकाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध केलेल्या ‘द ताओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकात भौतिकशास्त्राच्या गेल्या पाचशेहून अधिक वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला आहे. हिंदू, बौद्ध, ताओ, झेन इत्यादी पौर्वात्य आध्यात्मिक विचारधारांचा अभ्यास करून लेखकाने देकार्त, न्यूटनपासून ते आईन्स्टाइन, हायझेन्बर्ग व जीऑफ्रे च्युपर्यंतच्या या प्रवासात भौतिकशास्त्रज्ञांचा विश्वाविषयीचा ‘यांत्रिकी’ दृष्टिकोन कशा प्रकारे पौर्वात्य आध्यात्मिकांच्या ‘सजीव’ दृष्टिकोनाशी मिळताजुळता झाला, हे अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.
Author: Dr Fritjof Capra | Publisher: Majestic Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 288