लव्ह अॅट फर्स्ट साईट असे प्रेमाचे धागे जुळले की ते हृदयाचा कायमचा ताबा घेते. तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी काहीही करायची तयारी मनाची असते. दहावीतून कॉलेज लाईफमध्ये प्रवेश करताना हा अनुभव बहुतेकांना आलेला असतो.
सुहास शिरवळकर यांनी बरसात चांदण्याची मध्ये किशोरवयीन प्रेमाची कथा चंद्रवंदन व गंधाली यांच्याभोवती गुंफली आहे. शालेय जीवन संपवून पुढील वाटचाल सुरु होताना त्याने गंधालीला पाहिले आणि तो तिच्यात हरवून गेला. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली मिळाली.
त्यानंतर कॉलेजचे शिक्षण घेत असताना भेटीगाठी, पत्रव्यवहार यातून त्यांचे प्रेम फुलत राहिले. यात येणाऱ्या अडचणी, किशोर नावाचा स्पर्धक यातून बाहेर पडत अखेर दोघांच्या पसंतीला होकार मिळतो आणि चांदण्याची बरसात होते. बहरलेली ही प्रेमकथा वाचताना वाचकही त्यात हरवून जातात. कदाचीत कोवळ्या प्रेमाच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होऊ शकतात.
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 172