शरीराला अन्न आवश्यक असते. पण नुसते पोट भरून अन्नाचा फायदा शरीराला होतोच असे नाही. पोषणमूल्य असलेल्या अन्नाची गरज शरीराला असते. जीवनाचे रसायन योग्य प्रकारे सांभाळले तर अगदी गर्भधारणा, प्रसुतीनंतर बाळाचे पुढचे आयुष्य निर्वेध होते. शरीरातील प्रत्येक व्याधीचा सबंध आहाराशी असतो.
म्हणूनच बाल वयात, तरुणपणी, प्रौढावस्थेत व वार्धक्यातील आहार कसा असावा, या विषयी डॉ. मालती कारवारकर यांनी 'अन्नजिज्ञासा'मधून मार्गदर्शन केले आहे. शरीराला आवश्यक कॅल्शिअम, प्रोटिन्स कोणत्या पदार्थामधून मिळतात, खाण्याचे शात्र, सकाळचे नाश्त्याचे पदार्थ, दुपारचे जेवण, सायंकाळचे खाणे, रात्रीचे भोजन कसे असावे हे त्यांनी सानितले आहे.
यात आपण परंपरेने ज्या पदार्थाचे सेवन करतो, ते स्वादिष्ट असेल, तरी पोषणयुक्त असतातच असे नाही. त्यासाठी कोणते पदार्थ खावेत आणि का खावेत हे यात स्पष्ट केले आहे. सध्या मिळणाऱ्या बाजारू पदार्थाचे दुष्परिणामही सांगितले आहेत. शरीरस्वास्थासाठी अन्नजिज्ञासा कशी असावी
हे या पुस्तकातून कळते.
Author: Dr. Malti Karwarkar | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 166