Description
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणा-या मायेला "आवरण' म्हणतात. मला कळायला लागल्यापासून "सत्य-असत्याचा प्रश्न' हा छळणारा प्रश्न आहे. तीच समस्या "आवरण'मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे. मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही! डॉ. एस. एल. भौरप्पा
Details
Author: Dr. S. L. Bhyrappa | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 274