मेघदूत (Meghadoot)
मेघदूत (Meghadoot)
by Shanta Shelke
Regular price
Rs. 130.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 130.00
Unit price
/
per
Share
Product Description:
महाकवि श्रीकालिदास याचे 'मेघदूत' ही संस्कृत साहित्यातली एक स्वभावरमणीय अलौकिक कलाकृती आहे. 'मन्दाक्रान्ता' सारखे रसोचित वृत्त, प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे, विरहाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त झालेला उत्कट प्रणयभाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारी कालिदासाची सुश्लिष्ट शैली यांमुळे 'मेघदूता'ला अम्लान टवटवीत लावण्य लाभले आहे.
मराठीत 'मेघदूता'चे अनेक अनुवाद झाले आहेत. आता प्रसिद्ध कवयित्री शान्ता ज. शेळके या आपला अनुवाद रसिकांना सादर करीत आहेत.
साधी सरळ निवेदनपद्धती, छंदोबद्ध प्रवाही रचना, मूळ काव्याच्या रसवत्तेला बाध न आणता किंवा आशयाला ढका न लावता केलेली त्याची प्रतिकृती हे शान्ताबाईंच्या अनुवादाचे लक्षणीय विशेष आहेत.
'मेघदूता'च्या रसलुब्ध प्रेमिकांना तर हा अनुवाद आवडेलच, पण स्वतंत्रपणे वाचणारांनाही तो आस्वाद्य वाटेल.

Product Details:
Author: Shanta Shelke
Publisher: Mehta Publishing House
Binding: Paperback
Language: Marathi
Pages: 125
Book Condition:
View full details