Skip to product information
1 of 1

पार्टनर (Partner)

पार्टनर (Partner)

by V.P. Kale

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% off Sold out
Shipping calculated at checkout.

3 in stock

Product Description:

व.पु.काळे लिखित Partner Book म्हणजे अनुभवांची खान आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक पार्टनर असतो हि गोष्ट त्या प्रत्येक पार्टनरची आहे. जो पार्टनर नेहेमी आपल्या सोबत असतो, आपल्याला घडवतो, शिकवतो, जगायला लावतो, ज्या जगण्याला जो अर्थ देतो तो पार्टनर.

पुस्तकाचं नाव बघून तुमच्या मनात जो पार्टनर चा अर्थ आलाय तो हा नाहीये. हा वेगळा आहे. इतरांपेक्षा वेगळा पण जास्त जवळचा. हा पार्टनर स्त्री- पुरुषमध्ये गुंतत नाही हा त्या पलीकडे पोहोचतो.पुस्तकात एक कथा गुंपलीये. म्हणावी तर साधी सोपी. हि कथा काथाकथनकारांच्या रूपानं आपल्या समोर येते.

मुंबईच्या चाळी मध्ये राहणारा श्री. त्याच्या स्वतःच्या समस्या, अडचणी, त्या कथेच्या निमित्ताने येणार घटना प्रसंग, त्याचं कुटुंब आणि मग ह्या सगळ्या जीवनप्रवासात गवसलेला वाटाड्या.
लेखकाने कथा उत्तम लिहिली असून प्रत्येक व्यक्ती रेखा आणि त्यांच्यातील नात्यांची गुंफण अलगद मांडली आहे. कुणाचं तरी मुलगा होणं टाळता येत नाही परंतु कुणाचा तरी बाप होणं टाळता येत अशी अनेक कमालीच्या ओळी यामध्ये आहेत. हे पुस्तक पर्सनल टू युनिव्हर्सल आहे त्यामुळे हेय पुस्तक तुम्ही नक्की वाचाच.

Product Details:

Author: V.P. Kale

Publisher: Mehta Publishing House

Binding: Paperback

Language: Marathi

Pages: 152

Book Condition:

View full details