Skip to product information
1 of 1

निरामय कामजीवन (Niramay Kamjivan)

निरामय कामजीवन (Niramay Kamjivan)

by Dr. Vitthal Prabhu

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
10% off Sold out
Shipping calculated at checkout.

1 in stock

Product Description:

कामजीवन हे श्र्वसन, पचन, निद्रेसारखेच अगत्याचे; तरीही पर्यावरण, आहार, निद्रेविषयी जितकी जागरूकता आढळते, तितकी कामविज्ञानाविषयी आढळत नाही. विवाह पूज्य, मातृत्व पूज्य पण यातील दुवा म्हणजे कामजीवन हे अश्र्लील मानले जाते.

स्त्री-पुरुष मीलनाचा आनंद घेणे नैसर्गिक असले, तरी त्याविषयी उघडपणे चर्चा करणे शिष्टसंमत नसल्यामुळे कामविषयक परंपरागत अज्ञान व गैरसमजुती आजही टिकून आहेत. ही जळमटे नाहीशी करणारा हा ग्रंथ.

विसाव्या शतकाच्या मध्यानंतर आल्फ्रेड किन्से, डॉ. मास्टर्स व जॉन्सन, डॉ. हेलन सिंगर कॅप्लान यांच्या प्रदीर्घ संशोधनामुळे कामजीवनासंबंधीच्या विचारात जगभर आमूलाग्र बदल घडून आला. कामवृत्ती (Sexual Behaviour) कामप्रतिसाद (Sexual Response), कामअसमर्थता (Sexual Inadequacy) या विषयांची अधिक जाण आली. नपुंसकत्व, शीघ्रपतन, योनिआकर्ष, कामउदासीनता यांसारख्या लैंगिक समस्यांसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांनी सुचविलेले उपचार या ग्रंथात दिले आहेत. लैंगिकता शिक्षणावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे.

यौवनात पदार्पण, विवाहपूर्व मार्गदर्शन, विवाह, कामक्रिया, विवाहाची अपूर्तता, लैंगिक आगळीक, गर्भधारणा, संततिनियमन, एड्स, गुप्तरोग, जनननिवृत्ती, थोडक्यात-कुमारावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतची कामजीवनाची संपूर्ण माहिती सोप्या, सरळ, सुबोध भाषेत विवेचन करणारे हे एकमेव संग्राह्य पुस्तक.

Product Details:

Author: Dr. Vitthal Prabhu

Publisher: Majestic Publishing House

Binding: Paperback

Language: Marathi

Pages: 424

Book Condition:

View full details