Description
अनिल अवचट यांना माणसांची ओढ फार. माणसं नि त्यांचं काम समजून घेणं ही त्यांची जणू जीवनावश्यक गरजच. ज्यांनी फार मोठा विचार मांडला, मोठी स्वप्नं पाहिली, त्यासाठी आयुष्य पणाला लावलं अशा माणसांकडे अवचट खेचले जाणारच. या पुस्तकात आधीच्या अन् आजच्याही काळातल्या जवळच्या व्यक्तींविषयी अवचटांनी लिहिलंय. इतिहासातील थोर माणसांबद्दल लिहिताना अवचट त्यांच्यातील द्रष्टेपणामुळे दीपून जातात, तर समकालातील आप्तांविषयी लिहिताना त्यांची लेखणी मायेने ओथंबून येते. अवचटांच्या नजरेतून या व्यक्ती समजून घेताना एक नवी दृष्टी मिळून जाते..
Details
Author: Anil Avchat | Publisher: Samkalin Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 167

जवळचे (Javalache )
Rs. 250.00