आनंदाचं आणि स्वास्थ्याचं सॉफ्टवेअर
' आत्मज्ञानाचे विज्ञान' ( इनर इंजिनिअरिंग) हे पुस्तक म्हणजे सुखी व समृद्ध जीवन जगू पाहणाऱ्यांसाठी गुरुकिल्ली आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर ही एक अद्भुत प्रणाली आहे. आतल्या व बाहेरच्या जीवनऊर्जेशी शरीर आणि मनाचा योग्य प्रकारे समन्वय साधून अनंताच्या अमर्याद शक्ती व शक्यता अावाक्यात आणायला मदत करणारी ही प्रणाली समजावून सांगणारं हे क्रांतिकारी पुस्तक आहे. जीवनात विलक्षण कायापालट घडवण्याचा मार्ग , असंच याचं वर्णन करायला हवं. थोर विचारवंत, द्रष्टा व योगी म्हणून सुविख्यात असलेल्या सद्गुरूंनी त्यांच्या आध्यात्मिक व योगसिद्ध अनुभवांचं सार या पुस्तकात मांडलं आहे.
सकाळ प्रकाशनच्या या पुस्तकाला वाचकांचा तुडुंब प्रतिसाद लाभत आहे. हे पुस्तक अध्यात्माला वैज्ञानिक रीतीनं प्रस्तुत करतं. जगात असंख्य लोक सदगुरूंचे चाहते आहेत. ते त्यांची भाषणं युट्युबवरून वारंवार ऐकतात. त्यांची इंग्रजीत उपलब्ध पुस्तकं वाचतात. मराठी वाचकांसाठी खास साध्या, सोप्या भाषेत हा अनुवाद सकाळ प्रकाशनातर्फे मुद्दाम करून घेण्यात आला. अविनाश बर्वे यांनी अनुवादित केलेलं हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावं व इतरांना आवर्जून भेट द्यावं असंच आहे.
Author: Sadhguru | Publisher: Sakal Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 199