ज्याप्रमाणे पोलादाशिवाय मोटरगाड्या आणि विमानं बनवता
येणार नाहीत, त्याचप्रमाणे सामाजिक अस्थैर्याशिवाय
शोकांतिका लिहिणं शक्य होणार नाही.
ब्रेव्ह न्यू वर्ल्ड १९३२मध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा हक्सले आणि
त्याचे वाचक दोघांनाही या कादंबरीतील जग हे भयंकारी
डिस्टोपियन जग आहे याची कल्पना होती. पण सांप्रत काळी
‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ वाचणाऱ्यांची ही एक युटोपिया आहे अशी
चुकीची कल्पना होण्याची शक्यता आहे.
उपभोक्तावादाची वाटचाल अशीच चालू राहिली तर हक्स्लेंच्या
कल्पनेतील जग वास्तवात आलेलं पाहण्याचे दिवस दूर नाहीत.
आजकाल सुख आणि समाधान हेच सर्वोच्च मूल्य झाले आहे.
उपभोक्त्यांचे जास्तीतजास्त समाधान करण्यासाठी जैवतंत्रज्ञान
आणि सामाजिक अभियांत्रिकीचा होणारी वाढता वापर
आपल्याला एका भयंकारी विनाशाच्या दिशेने कसा घेऊन
चालला आहे हे तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर ब्रेव्ह न्यू
वर्ल्डमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान, सुखी समाधानी जीवन आणि
आयुष्याचा अर्थ यावरील सखोल ऊहापोह वाचलाच पाहिजे.
Author: Yuval Nova harari | Publisher: Mashushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 264