जेव्हा तुम्ही तुमच्या यशास पाठबळ मिळेल अशा पद्धतीने विचार करता, बोलता आणि तशी कृती करता, तेव्हा तुम्ही यशाची दारे खऱ्या अर्थाने सर्व बाजूने ठोठावत असता... आणि जीवनातील तुमच्या अपूर्व अशा यशाच्या मार्गाने वाटचाल करीत असता.
तुम्ही अशा प्रवासाचा आरंभ करीत आहात की, जो तुम्हाला स्वप्नवत असलेले यश आणि आनंद मिळवून देणार आहे, तर मग चला प्रवासास सुरुवात करू या....
या पुस्तकात प्रामुख्याने लेखकाला स्वत:ला आलेले नैराश्य पळवून लावण्यासाठी त्याने केलेले जोरदार प्रयत्न आणि कालांतराने त्यावर केलेली मात हे खरोखरीच विलक्षण असून, इतरांना प्रेरणात्मक ठरणारी अशीच बाब आहे.
‘‘हे पुस्तक पूर्णत: मनोवृत्ती या विषयावर आधारित आहे. या इंग्रजी पुस्तकाबद्दल येथे आवर्जून सांगावेसे वाटते की, वेळोवेळी आणि प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीस नमूद केलेली उदाहरणे, किस्से हे खूपच खुमासदार आणि मार्मिक असे आहेत. मनुष्याच्या जीवनात दृष्टिकोन किती महत्त्वपूर्ण काम करतो, हे पदोपदी लक्षात येते. ‘दृष्टिकोन म्हणजेच सर्वकाही’ आणि ‘तुमच्या दृष्टिकोनात बदल करा... आणि तुमचे जीवनच बदलेल!’ या दोन्ही उक्ती किती सार्थ आहेत, हे पुस्तक वाचताना लगेच पटते. ’’
- डॉ. मोहन उचगावकर
Author: Jeff Keller | Publisher: Saket Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 150