मुलांचे संगोपन हि एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. मात्र, आदर्श माता बनायचे असेल, तर जिजाऊ आईसाहेबांना आदर्श ठेवायला हवा. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना बालपणापासून दिलेले संस्कार त्यांना स्वराज्य मिळवण्यासाठी आणि ते राखण्यासाठी उपयुक्त ठरले. प्रा. नामदेवराव जाधव यांनी जिजाऊंची हीच थोरवी वाचकांसमोर उभी केली आहे.व्यवस्थापन म्हणजे काय, या प्रश्नाचे ते पुस्तकाची सुरुवात करतात. जिजाऊंनी महाराजांना सर्वांना सन्मानाची वागणूक द्यायला शिकवले होते.
चांगले काम केले, तर बक्षीस द्यायला शिकवले होते. त्याचं वेळी चांगल्या सवयी लावल्या. त्याचा उपयोग महाराजांना आयुष्भर झाला. महाराजांवर झालेल्या संस्कारांचे दाखले देत प्रा. जाधव यांनी योग्य सल्लागार सोबत ठेवा, प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत, की नाही याची खात्री करा, असे म्हटले आहे. हे सर्व करताना सामाजिक भान ठेवण्याचा सल्लाही ते देतात.
Author: Namdevrao Jadhav | Publisher: Rajmata Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 223