क्लिअर थिंकिंग (Clear Thinking )

By: Shane Parrish (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 300.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description
जगाकडे स्वच्छ, स्पष्ट पाहण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. पण 'ते तसे कसे पाहायचे' हे कोणाला शिकवलेलेच नसते. या पुस्तकाच्या माध्यमातून शेन पॅरिश तुम्हाला मदत करतील. 'गुप्तहेर' म्हणून काम केलेले, वॉल स्ट्रीटवरील मुरब्बी गुंतवणूकदारांनाही सल्ला देणारे शेन यांच्याकडून स्वच्छ, स्पष्ट विचार करण्याची कला शिकून घ्या. ते मानवाच्या उत्क्रांतिदशेतील भावनिक संघर्षापासून आजच्या 'चॅलेंजर' या उपग्रहाच्या विनाशाच्या रहस्यापर्यंतची अनेक उदाहरणे देऊन कोणतीही बरी-वाईट, सोपी- अवघड परिस्थिती पूर्णतया समजून घेण्याकरता, तिचा सामना करण्याकरता मानसिक सामर्थ्य निर्माण करण्याची अतिशय प्रभावी साधने आपणास देतात. सुयोग्य, उत्तम, परिणामकारक निर्णय घेण्याची अगदी साधी सोपी, सहजी वापरता येण्यासारखी पद्धतही शिकवतात. ते मन स्वच्छ ठेवण्याचे मनाची संवेदनक्षमता, ग्रहणक्षमता, समज वाढवण्याचे रहस्य उघड करतात. या पुस्तकात जे सांगितले आहे, ते अगदी साधे-सोपे वाटणारे असले, तरी त्यात फार मोठा, सखोल आणि त्यामुळेच आश्चर्यजनक असा गर्भितार्थ साठलेला आहे मन स्वच्छ करा, डोक्यातला गुंता काढून टाका, उद्या तुमचे आयुष्य बदललेले असेल! About the Author शेन पॅरीश हे 'फर्नाम स्ट्रीट'चे संस्थापक, चालक आणि ज्ञानशोधक आहेत. 'द नॉलेज पॉडकास्ट'चेही सूत्रसंचालक तेच आहेत. त्यांचे लिखाण न्यूयॉर्क टाइम्स, द वॉल स्ट्रीट जर्नल, हफिंग्टन पोस्ट आणि फोर्ब्स यासारख्या जवळ जवळ प्रत्येक नावाजलेल्या, लोकप्रिय वर्तमानपत्रात, नियतकालिकात प्रकाशित होत असते.
Details

Author: Shane Parrish | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 312